कृष्णजन्म
गिरिशिखरी कुंजवनी, तरुतळी सरते वेळी, अलगद गुंजावी , वेणूची स्वरलहरी
ऋतूतील कुसुमाकर, मासांतील मार्गशीर्ष , मधुमासी रामचंद्र, आला यमुनातीरी ।
प्रासादिक कृष्ण रजनी , शुभघटिका मध्यरात्री, यमपाश संहारितो , वासुदेव श्रीहरी।
यमुनेच्या जललहरी, स्पर्शत चरणकमळी, अवतरते योगमाया, मथुरेच्या कारागृहीं
गोकुळ जमले भवती, मंतरले दिवस परी , आनंद भूमंडळी, खेळत वनमाळी ।
शरदाची चंद्ररात्र, गोप गोपी रास रची, कुमुदरंगी कमलिनी, सुगंधा अचलसृष्टी
बन्सीधर युगविहारी , मोरपिसे मुकुटावरी, वृंदावनी राधेचे , गुपित मुदित मनोमनी।
-मनीषा
Comments