ऋत
रस्ताभर अंथरलेली फुले, भिरभिरता पान पाचोळा
कुठून कुठून गोळा झाल्या काड्या काटक्या, वाऱ्याचा वेग झेपेना |

तृष्णेच्या परिसीमेवर उभी, उकललेली, भेगाळलेली जमीनीची शुष्क किनार
झाडोऱ्या पलीकडे, आभाळाच्या कडेला दाटू लागलेला कुंद अंधार |

थेंबांची प्रतीक्षा,ओलाव्याची अपेक्षा, गवतामध्ये उमटला हुंकार
मावळला अग्नीकल्लोळ, झाकोळला पसारा, संपला एक करार |

रानोमाळ झेपावले रंगीत आठवणींचे कालातीत पक्षी
जाणिवेच्या अंतराळात धूसरले ढग, त्यांचे काळीजच पाणी |

पुसल्या गेल्या काही खुणा, विरून गेली काही दृश्ये, पुन्हा बदलले मायेचे वस्त्र
आणि परत जुळले विश्वाचे ऋत, जीवन-मृत्यूचे कंकण, अमृताचे वचन..

Comments