देवाचे घर
मंदिर , देवालय ह्या शब्दांनीच जणू काही वातावरण निर्मिती होते . अनेक शतके पाहिलेल्या त्या काळ्या चिरेबंदी दगडांचा आश्वासक स्पर्श हाताना जाणवतो . नाकाशी उदबत्तीचा फुलांचा आणि निरान्जानाचा एकत्र झालेला वास रुंजी घालतो . कानाला जवळच्या नदीचा खळखळाट, पिंपळाच्या पानांची सळसळ आणि हलक्या आवाजातले मंत्र पठण ऐकू येऊ लागते. ही किमया त्या वास्तूची !
मंदिर स्थापत्याचा इतिहास आणि वर्तमान बघायच्या आधी थोडेसे मंदिराच्या रचने विषयी.
मंदिराच्या पायया चढून आत गेलो आणि वरती पाहिले की आपले स्वागत करते ते रेखीव मकरतोरण. त्यानंतर आपण प्रवेश करतो तो प्राकार असतो रंगमंडप किंवा सभामंडप. रंगमंडपाच्या मध्यभागी गोलाकर उठाव असतो ती असते रंगशीळा. त्यानंतर गर्भगृहाकडे जाताना लागते ते अंतराळ, म्हणजे मंडप व गर्भगृह यांना जोडणारी भिंतीची पट्टी . मग लागते गर्भगृहाचे द्वार जे द्वारशाखेने सुशोभित केलेले दिसते. द्वारशाखेवर शिल्प-चित्रांची दाटी असु शकते. याच ठिकाणी गंगा-यमुना, द्वारपाल वगैरे कोरलेले दिसतात. गार्भगृहात प्रवेश करतनाची पायरी असते ते चन्द्रशीला आणि त्यावर कोरलेली राक्षसी मुद्रा असते ते म्हणजे किर्तिमुख. गर्भगृहा मध्ये विराजमान असते आराध्य दैवताची मूर्ती. गर्भगृहाच्या वर मंदिराचे मुख्य शिखर उभे असते. सभामंडपावर दुय्यम शिखर असते. मंदिराच्या भिंतींवर बाहेरील बाजूने असतात ती देवकोष्ठके म्हणजे कोरीव चौकटी ज्यामध्ये इतर दैवतांच्या मूर्ती बसवल्या जातात. मंदिराचे विधान चौरस , आयताकृती तर कधी कधी चापा कार पण असते.
भारतीय मंदिर स्थापत्याची सुरुवात सध्याचे पुरावे बघितले तर गुप्त काळापासून झाली असे म्हणावे लागते. गुप्त काळ म्हणजे समुद्रगुप्त ,चंद्रगुप्त विक्रमादित्य इत्यादी पराक्रमी राजांच्या कारकीर्दीने गाजवलेला.
इसविसनाचा चौथ्या व पाचव्या शतकाचा कालखंड. ह्या काळात मंदिर उभारणी चे काही संकेत तयार झालेले दिसतात .सांचीच्या प्रचंड स्तूपा समोरची चौकोनी चार खांबावर तोललेली सपाट छपराची वास्तू व त्या बाहेरील ओवरी हा मंदिर स्थापत्याचा पहिला प्रयत्न समजला जातो . सांचीचा स्तूप जरी इसविपूर्व तिसया शतकातील असला तरी ही आद्य मंदीराची रचना मात्र गुप्त काळात झाली असे मानले जाते. या पूर्वीच्या काळात मंदिरे होती किंवा कसे यावर तसे निर्णायक काही सांगता येत नाही. इसवीसनाच्या सुमारास लिहिल्या गेलेल्या साहित्यात, मुख्यत्वे भास कवीच्या नाटकात ‘देवकुल’ असे उल्लेख आढळतात . हे देवकुल म्हणजे देवालय असू शकते. मुख्यत्वे सार्वजनिक मूर्तीपूजा आणि मंदिर निर्मिती ह्यांचा जवळचा संबंध आहे.
जाता जाता हे पण लक्षात ठेवले पाहिजे कि पांडवकालीन मंदिर वगैरे शब्दांना काहीही अर्थ नाही. पांडवांचा काळ निश्चित नाही तर मंदिर पांडवकालीन कसले आणि पांडवांचा काळ अगदी 3000 ईपू पर्यंत मागे जाऊ शकतो.
तर पुन्हा एकदा मंदिर स्थापत्याच्या पहिल्या टप्प्याकडे.ह्या काळातील मंदिरे हे बहुदा चौसर जोत्यावर उभी दिसतात तसेच गर्भगृह व त्यावर कळस हे दिसतेच पण पुढील सभामंडप तितकासा आढळत नाही. ह्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे देवगढ ,उत्तर प्रदेश येथले. इथली कोष्ठक शिल्पे अभ्यासण्यासारखी आहेत. नर-नारायण शेषशायी -विष्णू ह्या शिल्पांनी ह्या मंदिराच्या भिंती सजवल्या आहेत. या प्रकारची गुप्तकालीन मंदिरे मध्य भारतात सापडतात. ते बरीचशी पडक्या अवस्थेत असून आतील आराध्य दैवताच पत्ता नाही असे साधारण चित्र आहे.
या पुढची मंदिर निर्मितीची वाटचाल बघण्या आधी मंदिरांचे एकून ठळक प्रकार लक्षात घेतले पाहिजेत.
नागर आणि द्राविड ही मंदीर शैलींची दोन नावे आहेत. नागर शैलीमध्ये मंदिराच्या उंचीवर भर असतो , शिखर बहुदा सरळसोट चढत जाऊन निमुळते होते . तर द्राविड शैली मध्ये मंदिरांची ठेवण बसकट असते. यामधे एकाहून एक लहान होत जाणाऱ्या शिल्पमंडीत चौकोनी शिखरांची बांधणी केलेली दिसते. नागर प्रकारची मंदिरे बहुदा उत्तर भारतात सापडतात तर द्राविड पद्धतीची मंदिरे बहुतांशी दक्षिण भारतात मिळतात. यापलीकडेही वेसर नावाची एक शैली आहे ज्यात नागर व द्राविड शैली एकत्र केल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील हेमाडपंती समजली जाणारी मंदिरे हे बहुदा नागर पद्धतीची असतात. त्यांना भूमिज असेही संबोधले जाते. याशिवाय त्या त्या काळानुसार व प्रदेशानुसार मंदीरांची विविध रूपे बघायला मिळतात.
सुरुवातीच्या साध्या सुध्या चार भिंती आणि उंचावलेले छप्पर या रचनेपासून खजुराहो , कोणार्क ते आत्ताचे अक्षरधाम मंदिर, येथपर्यंत मंदिराच्या माध्यमातुन जणू इतिहास च आपल्याशी बोलतो. बऱ्याच जणांनी कर्नाटकामध्ये पट्ट्ड्कल ला भेट देऊन तिथल्या सुंदर मंदिराचे कौतुक केलेले असते. पण तिथले खरे वैशिष्ट्य हे एकाच प्रांगणात दिसणारी नागर आणि द्राविड शैलीचे मंदिरे हे आहे . इसविसनाच्या सातव्या शतकात उभारलेली हे मंदिरे म्हणजे मंदिर निर्मितीचा आणि शैली विकासाचा पहिला टप्पा असणार. विरुपाक्ष मंदीर हे द्रावीड शैलीचे आहे तर पापनाथ व जंबुलिंग ही पूर्ण नागर शैलीमधे बंधलेली दिसतात.या नंतर मात्र नागर शैलीची मंदिरे इतकी दक्षिणेकडे कुठेही मिळत नाहीत. आंध्र मधील आलमपुर येथले नवब्रह्म मंदिर हे नागर शैलीचे दक्षिणे मधले एकमेव मंदिर आहे .
महाबलीपुरमला समुद्रावरचे वारे झेलत, उंच माडांच्या जवळ 'पंच रथ ' नावाने ओळखले जाणारे एक आश्चर्य आहे. इथे पुन्हा एकाच प्रांगणात मंदिर शैलीचे पाच वेगळे प्रकार बघायला मिळतात . एक पक्का द्राविड शैलीचा नमुना, एक झोपडी वजा शिखराचा प्रकार, एक चौरस विधानाचे देऊळ, एक गजपृष्ठाकृती छपराचे तर एक चापाकार विधानाचे मंदिर! सगळ्यात कडी म्हणजे ही बांधलेली मंदिरे नसून, एका पाषाणात घडवलेली मंदिर शिल्पे आहेत. सहाव्या शतकात रचली गेलेली ही शिल्पे ह्याचाच मोठा अविष्कार वेरूळ चे नवव्या शतकात घडवले गेलेले कैलास मंदिर आहे
खजुराहोची अती देखणी मंदिरे हे नागर शैलीचा उत्कृष्ट नमुना आहेत. उरुश्रुंग' पद्धतीची शिखर व उपशिखरांची नेटकी मांडणी, विलक्षण कोरीव कामाने नटलेल्या भिंती, व नजर व्यापून मनाला भारणारे उत्तुंग स्थापत्य! नागर प्रकारामधील उर्ध्वगामी सूत्र, इथे तंतोतंत उतरलेले दिसते.
याचप्रमाणे दक्षिण भारतामधील सर्वच मंदिरे विशेषत: तंजावर, कांची, चिदम्बरम येथील मंदिरे द्राविड शैलीचे सुयोग्य प्रतिनिधित्व करतात. तंजावर येथील चोळ राजांनी बांधलेले बृहदिश्वर मन्दिर हे भव्यता आणि डौल य दोन्ही बाबतीत अतुलनीय आहे. द्राविड शैलीचा एक महत्वाचा घटक म्हणजे गोपुर. दक्षिणेमधे मंदिरापेक्षाही कधीकधी गोपुर अधिक उठावदार असते. गोपुर हे खरेतर मंदिराभोवतीच्या प्रांगणाचे प्रवेशद्वार आहे. द्राविड पध्दतीमधे हे प्रवेशद्वार अधिक उंच, अधिक शिल्पांनी सजलेले व पुष्कळदा अधिक रंगीत पण असते.
मंदिरे, देवळे हे भारताची एक ओळखच आहे असे म्हटले तरी चालेल. प्रवास करताना एखाद्या अगदी चिमुकल्या गावाची चाहूलसुध्दा हिरव्या झाडीमधून डोकावणाऱ्या एखाद्द्या मंदीराच्या कळसाने लागते. अशी ह्या भारताच्या काना कोपऱ्यात आढळणारी विविध मंदिरे अनेकदा स्वत:च्या प्रादेशिक शैली मिरवताना दिसतात
उत्तरेमध्ये हिमालयाच्या कुशीतली मंदिरे हे प्रामुख्याने नागर असली, तरी तिथेही मंदिराचा वरच्या भागात लाकडी अथवा पत्र्याचे उतरते छप्पर बांधलेले दिसते. त्यामुळे पागोडा सारखी दिसणारी हे मंदिरे नक्कीच उठून दिसतात.
सुदूर पूर्वेत,आसामातील शिबसागर येथील शिवडोल मंदिरांचे निमुळते होत जाणारे फ़ुगिर कळस व त्यावरील उभ्या रेषांचे पट पहाताक्षणी मनात भरतात. गोवाहातीचे प्रसिध्द कामाख्या मंदीर हे ह्या वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने बांधलेले दिसते. बंगाल प्रांतात सापडणारी बिश्णुपूर येथली मातीची,गेरू रंगांची सुंदर मंदिरे,त्यांच्या गोलसर कमानी आणि पुष्ट घुमटांचे कळस यामुळे भौमितिक रेषांचे जणु एखादे लयदार नृत्य पहावे असे वाटते.
ओरिसा मध्ये पुरी व भुवनेश्वर मधील मंदिरे नागर शैलीचीच असूनही त्यात कळसांचे वेगळेपण दिसते. भव्य गगनाला गवसणी घालणारे धारदार रेषांचे उंच झेपावणारे मंदिराचे शिखर तत्काळ तुम्हाला खुजे बनवते.
पश्चिमेतील गुजराथ-राजस्थान मधील कमानी, घुमट यांनी अलंकारलेली मंदिर शैली नागर असूनही स्वत:चे वेगळेपण दाखवते.
महाराष्ट्रामधेही सासवडचे भुलेश्वर मंदीर हे मिनार आणि घुमटसदृश कळस यांनी नटलेले मंदिर आहे. मुसलमानी वास्तुशैलीचा मिलाफ होऊन पारंपारिक हिंदू नागर /द्राविड पध्दतींमधे घुमट,मिनार वगैरे घटक आले असे मानले जाते.
भारतभर आढळणाऱ्या मंदिर स्थापत्याचा हा ओझरता आढावा आहे.
ह्या विषयावर तज्ञांनी भरपूर लिखाण केले असून ते जालावर अथवा पुस्तकालयात मिळू शकते. मंदिर स्थापत्याच्या अभ्यासामधे मंदिरर रचने बरोबर, शिल्पाकृती, मूर्ती, खांबांची रचना, त्यावरील नक्षीकाम, चौकटी, कमानी यांचा विचार ही पूरक असतो. ह्या सर्वांच्या एकत्रित माहिती नंतरच देवालयाचा काळ अथवा गायब असलेल्या आराध्य दैवताचा तर्क करता येतो.
आणि मग कधी तरी ह्या तर्क, अभ्यासाच्या पलीकडेही काही तरी जाणवते. अशाच एखाद्या भग्न देवालयाच्या ओट्यावर बसून, मत्त वाऱ्याच्या झोतांनी उधळणारा पाला पाचोळा गाभाऱ्याच्या आत येउ बघतो, कुठे तरी सांदी-सपाटीमधून पिंपळाचे कोवळे पान डोकावते, आणि उन्हा-पावसानी दगडावर उमटलेल्या काळाच्या खुणा हाताच्या बोटानी चाचपताना माझा, माझ्याच इतिहासाशी एक एक रेशिम धागा जुळत जातो.
काही संदर्भ ग्रंथ खालीलप्रमाणे प्राचीन कलाभारती - म. श्री. माटे आर्ट ओफ़ एन्शंट इंडीया - सुझान हंटिग्टन
अनुबंध, युरोपीय मराठी संमेलन अंकामध्ये पूर्वप्रकाशित , मार्च २०१३
सास-बहु मंदिर , नागदा , राजस्थान |
मंदिराच्या पायया चढून आत गेलो आणि वरती पाहिले की आपले स्वागत करते ते रेखीव मकरतोरण. त्यानंतर आपण प्रवेश करतो तो प्राकार असतो रंगमंडप किंवा सभामंडप. रंगमंडपाच्या मध्यभागी गोलाकर उठाव असतो ती असते रंगशीळा. त्यानंतर गर्भगृहाकडे जाताना लागते ते अंतराळ, म्हणजे मंडप व गर्भगृह यांना जोडणारी भिंतीची पट्टी . मग लागते गर्भगृहाचे द्वार जे द्वारशाखेने सुशोभित केलेले दिसते. द्वारशाखेवर शिल्प-चित्रांची दाटी असु शकते. याच ठिकाणी गंगा-यमुना, द्वारपाल वगैरे कोरलेले दिसतात. गार्भगृहात प्रवेश करतनाची पायरी असते ते चन्द्रशीला आणि त्यावर कोरलेली राक्षसी मुद्रा असते ते म्हणजे किर्तिमुख. गर्भगृहा मध्ये विराजमान असते आराध्य दैवताची मूर्ती. गर्भगृहाच्या वर मंदिराचे मुख्य शिखर उभे असते. सभामंडपावर दुय्यम शिखर असते. मंदिराच्या भिंतींवर बाहेरील बाजूने असतात ती देवकोष्ठके म्हणजे कोरीव चौकटी ज्यामध्ये इतर दैवतांच्या मूर्ती बसवल्या जातात. मंदिराचे विधान चौरस , आयताकृती तर कधी कधी चापा कार पण असते.
भारतीय मंदिर स्थापत्याची सुरुवात सध्याचे पुरावे बघितले तर गुप्त काळापासून झाली असे म्हणावे लागते. गुप्त काळ म्हणजे समुद्रगुप्त ,चंद्रगुप्त विक्रमादित्य इत्यादी पराक्रमी राजांच्या कारकीर्दीने गाजवलेला.
इसविसनाचा चौथ्या व पाचव्या शतकाचा कालखंड. ह्या काळात मंदिर उभारणी चे काही संकेत तयार झालेले दिसतात .सांचीच्या प्रचंड स्तूपा समोरची चौकोनी चार खांबावर तोललेली सपाट छपराची वास्तू व त्या बाहेरील ओवरी हा मंदिर स्थापत्याचा पहिला प्रयत्न समजला जातो . सांचीचा स्तूप जरी इसविपूर्व तिसया शतकातील असला तरी ही आद्य मंदीराची रचना मात्र गुप्त काळात झाली असे मानले जाते. या पूर्वीच्या काळात मंदिरे होती किंवा कसे यावर तसे निर्णायक काही सांगता येत नाही. इसवीसनाच्या सुमारास लिहिल्या गेलेल्या साहित्यात, मुख्यत्वे भास कवीच्या नाटकात ‘देवकुल’ असे उल्लेख आढळतात . हे देवकुल म्हणजे देवालय असू शकते. मुख्यत्वे सार्वजनिक मूर्तीपूजा आणि मंदिर निर्मिती ह्यांचा जवळचा संबंध आहे.
जाता जाता हे पण लक्षात ठेवले पाहिजे कि पांडवकालीन मंदिर वगैरे शब्दांना काहीही अर्थ नाही. पांडवांचा काळ निश्चित नाही तर मंदिर पांडवकालीन कसले आणि पांडवांचा काळ अगदी 3000 ईपू पर्यंत मागे जाऊ शकतो.
तर पुन्हा एकदा मंदिर स्थापत्याच्या पहिल्या टप्प्याकडे.ह्या काळातील मंदिरे हे बहुदा चौसर जोत्यावर उभी दिसतात तसेच गर्भगृह व त्यावर कळस हे दिसतेच पण पुढील सभामंडप तितकासा आढळत नाही. ह्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे देवगढ ,उत्तर प्रदेश येथले. इथली कोष्ठक शिल्पे अभ्यासण्यासारखी आहेत. नर-नारायण शेषशायी -विष्णू ह्या शिल्पांनी ह्या मंदिराच्या भिंती सजवल्या आहेत. या प्रकारची गुप्तकालीन मंदिरे मध्य भारतात सापडतात. ते बरीचशी पडक्या अवस्थेत असून आतील आराध्य दैवताच पत्ता नाही असे साधारण चित्र आहे.
या पुढची मंदिर निर्मितीची वाटचाल बघण्या आधी मंदिरांचे एकून ठळक प्रकार लक्षात घेतले पाहिजेत.
नागर आणि द्राविड ही मंदीर शैलींची दोन नावे आहेत. नागर शैलीमध्ये मंदिराच्या उंचीवर भर असतो , शिखर बहुदा सरळसोट चढत जाऊन निमुळते होते . तर द्राविड शैली मध्ये मंदिरांची ठेवण बसकट असते. यामधे एकाहून एक लहान होत जाणाऱ्या शिल्पमंडीत चौकोनी शिखरांची बांधणी केलेली दिसते. नागर प्रकारची मंदिरे बहुदा उत्तर भारतात सापडतात तर द्राविड पद्धतीची मंदिरे बहुतांशी दक्षिण भारतात मिळतात. यापलीकडेही वेसर नावाची एक शैली आहे ज्यात नागर व द्राविड शैली एकत्र केल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील हेमाडपंती समजली जाणारी मंदिरे हे बहुदा नागर पद्धतीची असतात. त्यांना भूमिज असेही संबोधले जाते. याशिवाय त्या त्या काळानुसार व प्रदेशानुसार मंदीरांची विविध रूपे बघायला मिळतात.
चेन्नाकेशव मंदिर, सोमानाथपुर, कर्नाटक - वेसर शैली |
सुरुवातीच्या साध्या सुध्या चार भिंती आणि उंचावलेले छप्पर या रचनेपासून खजुराहो , कोणार्क ते आत्ताचे अक्षरधाम मंदिर, येथपर्यंत मंदिराच्या माध्यमातुन जणू इतिहास च आपल्याशी बोलतो. बऱ्याच जणांनी कर्नाटकामध्ये पट्ट्ड्कल ला भेट देऊन तिथल्या सुंदर मंदिराचे कौतुक केलेले असते. पण तिथले खरे वैशिष्ट्य हे एकाच प्रांगणात दिसणारी नागर आणि द्राविड शैलीचे मंदिरे हे आहे . इसविसनाच्या सातव्या शतकात उभारलेली हे मंदिरे म्हणजे मंदिर निर्मितीचा आणि शैली विकासाचा पहिला टप्पा असणार. विरुपाक्ष मंदीर हे द्रावीड शैलीचे आहे तर पापनाथ व जंबुलिंग ही पूर्ण नागर शैलीमधे बंधलेली दिसतात.या नंतर मात्र नागर शैलीची मंदिरे इतकी दक्षिणेकडे कुठेही मिळत नाहीत. आंध्र मधील आलमपुर येथले नवब्रह्म मंदिर हे नागर शैलीचे दक्षिणे मधले एकमेव मंदिर आहे .
पंच रथ , महाबलीपुरम, तामिळनाडू |
महाबलीपुरमला समुद्रावरचे वारे झेलत, उंच माडांच्या जवळ 'पंच रथ ' नावाने ओळखले जाणारे एक आश्चर्य आहे. इथे पुन्हा एकाच प्रांगणात मंदिर शैलीचे पाच वेगळे प्रकार बघायला मिळतात . एक पक्का द्राविड शैलीचा नमुना, एक झोपडी वजा शिखराचा प्रकार, एक चौरस विधानाचे देऊळ, एक गजपृष्ठाकृती छपराचे तर एक चापाकार विधानाचे मंदिर! सगळ्यात कडी म्हणजे ही बांधलेली मंदिरे नसून, एका पाषाणात घडवलेली मंदिर शिल्पे आहेत. सहाव्या शतकात रचली गेलेली ही शिल्पे ह्याचाच मोठा अविष्कार वेरूळ चे नवव्या शतकात घडवले गेलेले कैलास मंदिर आहे
खजुराहोची अती देखणी मंदिरे हे नागर शैलीचा उत्कृष्ट नमुना आहेत. उरुश्रुंग' पद्धतीची शिखर व उपशिखरांची नेटकी मांडणी, विलक्षण कोरीव कामाने नटलेल्या भिंती, व नजर व्यापून मनाला भारणारे उत्तुंग स्थापत्य! नागर प्रकारामधील उर्ध्वगामी सूत्र, इथे तंतोतंत उतरलेले दिसते.
कांधारीया महादेव मंदिर, खजुराहो, मध्य प्रदेश - नागर शैली |
जुळी मंदिरे, महाबलीपुरम , तामिळनाडू -द्राविड शैली |
मंदिरे, देवळे हे भारताची एक ओळखच आहे असे म्हटले तरी चालेल. प्रवास करताना एखाद्या अगदी चिमुकल्या गावाची चाहूलसुध्दा हिरव्या झाडीमधून डोकावणाऱ्या एखाद्द्या मंदीराच्या कळसाने लागते. अशी ह्या भारताच्या काना कोपऱ्यात आढळणारी विविध मंदिरे अनेकदा स्वत:च्या प्रादेशिक शैली मिरवताना दिसतात
नारायण मंदिर, बटेसरी, हिमाचल प्रदेश |
सुदूर पूर्वेत,आसामातील शिबसागर येथील शिवडोल मंदिरांचे निमुळते होत जाणारे फ़ुगिर कळस व त्यावरील उभ्या रेषांचे पट पहाताक्षणी मनात भरतात. गोवाहातीचे प्रसिध्द कामाख्या मंदीर हे ह्या वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने बांधलेले दिसते. बंगाल प्रांतात सापडणारी बिश्णुपूर येथली मातीची,गेरू रंगांची सुंदर मंदिरे,त्यांच्या गोलसर कमानी आणि पुष्ट घुमटांचे कळस यामुळे भौमितिक रेषांचे जणु एखादे लयदार नृत्य पहावे असे वाटते.
ओरिसा मध्ये पुरी व भुवनेश्वर मधील मंदिरे नागर शैलीचीच असूनही त्यात कळसांचे वेगळेपण दिसते. भव्य गगनाला गवसणी घालणारे धारदार रेषांचे उंच झेपावणारे मंदिराचे शिखर तत्काळ तुम्हाला खुजे बनवते.
पश्चिमेतील गुजराथ-राजस्थान मधील कमानी, घुमट यांनी अलंकारलेली मंदिर शैली नागर असूनही स्वत:चे वेगळेपण दाखवते.
महाराष्ट्रामधेही सासवडचे भुलेश्वर मंदीर हे मिनार आणि घुमटसदृश कळस यांनी नटलेले मंदिर आहे. मुसलमानी वास्तुशैलीचा मिलाफ होऊन पारंपारिक हिंदू नागर /द्राविड पध्दतींमधे घुमट,मिनार वगैरे घटक आले असे मानले जाते.
भारतभर आढळणाऱ्या मंदिर स्थापत्याचा हा ओझरता आढावा आहे.
मीरा मंदिर, चित्तौड , राजस्थान |

Comments