भारतीय इंग्रजी माध्यमांचे अनाकलनीय वर्तन

rdictअलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय जाहीर झाला आणि माझ्यासारख्या अनेक भारतीय नागरिकांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला. बहुचर्चित रामजन्मभूमी - बाबरी मशिद वादात हिंदू गटांचा दावा मान्य करण्यात आला व वादस्त जागेची मालकीही सोपवण्यात आली. सुन्नी वक्फ़ बोर्डास १/३ जागेची मालकी देण्यात आलेली असली तरी हा निकाल सर्वसाधारणत: हिंदूंच्या बाजूने लागल्याचे दिसते.


लोकशाही ही बहुसंख्यांच्या मताचा/भावनेचा आदर करण्यासाठी राबवली जाते. न्यायालयाचा निर्णय हा इतर पुराव्यांच्या उपलब्धी/अनुपलब्धी बरोबरच बहुसंख्यांच्या भावनेचा आदर करणारा आहे.

पण ह्या सुखद भावनेस धर्मनिरपेक्षतेचे अवघड सुकाणु पेलणार्‍या भारतीय इंग्रजी माध्यमांनी मात्र अजिबात थारा दिला नाही

एनडीटीवी ची बरखा दत्त ह्या एकाच पत्रकाराचे दोन्ही दिवस कार्यक्रम पाहुन त्यांच्या भूमिका, त्यांचे ग्रह, त्यांचे आवेश ह्या सगळ्याचाच अचंबा वाटू लगला. राजदीप सरदेसाई, अर्णब रॉय वगैरे ही त्याच गटात मोड्तात पण त्यांचा ’परफ़ॉर्मन्स’ मी पाहिला नाही.

बरखाबाईंच्या वागण्यातील खटकलेले काही मुद्दे असे

१. मुलिमांनी १/३ जागेवर मशिद बांधावी असे निकालपत्रात म्हणलेले नाही पण बांधू नये असेही म्हणलेले नाही. त्यमुळे वक्फ़ चे वकिल जिलानी यांच्या मते -’ त्या मोकळ्या जागेवर आम्ही मशिद बंधू शकतो व ह मुद्दा त्यांना (हिंदूंना) कटकटीचा होईल.’ - बरखाला तिथे मशिद बांधता येणार याचा अवर्णनीय आनंद झाला. आणि त्यानंतर मंदिर शब्दा बरोबर मशिद बांधण्याचा सतत उल्लेख करुन, तसे प्रश्न गरज नसताना विचारून एक प्रकारे काडी लावायचा प्रयत्न केला.

२. एनडीटीवी च्या मते जाणकार असलेले अनेक इतिहासकार बोलावून त्यांच्याकडून हा निकाल ’ कसा जरासा चुकीचा वाटतो आहे नाही?’ असा सुरात सूर मिळवून घेतला. बोलावलेले इतीहासकार म्हणजे राम गुहा, विनय लाल जे डावे व कम्युनिस्ट म्हणून प्रसिध्द आहेत. एकांगी मते व तीही मुस्लिमांच्या बाजूची असतील तर एका बाजूने शांततेचा जप करत ती प्रसृत करण्याचा व त्यायोगे तेढ वाढवण्याचा बरखाचा प्रयत्न दिसला जे खरच अचंबीत करणारे होते. निकालानंतर पहिली प्रतिक्रिया विरोधी ( राजीव धवन) देण्यामागे निकालाला पाठिंबा स्पष्ट होत नाही. दुसर्‍या दिवशी ASI चा रिपोर्ट देखील डागाळलेला आहे असे टाइम्स चे मत होते, त्याला आधार अर्थात इरफ़ान हबीब यांचा होता.

३. १९९२ सालची बाबरी मशीद पाडण्याची घटना कोणीही विसरू नये याची बरखास तळमळ लागून राहिलेली दिसली. हा निकाल म्हणजे बाबरी पाडण्याच्या धिक्कारदायक व गुन्हेगारी घटनेपासून मुक्ती आहे असे तर समजले जाणार नाही ना हा प्रश्न तिला वारंवार पडला. पण १९४७ च्या पूर्वीच्या सर्व घटनांचे विस्मरण झाले असल्याने, ’मशिद का पाडली’ ह्यावर चर्चाच काय एक शब्द ही बोलला गेला नाही.

४. एकुणात ह्या निर्णयातील मुस्लिमांच्या विरोधात गेलेल्या बाबी ह्या न्याय्य नसाव्यात असा स्वत:च्या व निमंत्रितांच्या बोलण्यातुन संदेह निर्माण होईल असा बरखाने पूर्ण प्रयत्न केला.

५. माहीती माध्यम अथवा ’बातम्या’ वाहीनी कडून प्रेक्षकांच्या काही अपेक्षा असतात, त्या तर अजिबात पूर्ण झाल्या नाहीत. खालील मुद्द्यांविषयी योग्य/अयोग्य कुठलीच माहिती पहिल्या दोन दिवसात मिळाली नाही.

- निर्मोही अखाडा म्हणजे नक्की कोण?

- खटल्यामधील वादी व प्रतीवादी कोण आहेत?

- वादग्रस्त जागेचे जुने व नवे प्रकाशचित्र, किंवा लघुरूप ज्यायोगे, नक्की जमीनीचा आराखडा लक्षात येइल व निकाल समजण्यास मदत होईल ( मला वाटते इंडिया टिवी वर हे दाखवले गेले पण त्यांच्या भडक पद्धतीने )

- जागेच्या वाटणीविशयी तद्न्यांच्या सूचना - कशा प्रकारे वापरता येईल हे स्थापत्य दृष्टीकोणातून पाहणे.

ह्याहून ही बरेच मुद्दे मांडता येतील, पण नमुन्यादाखल वरती दिलेले ही पुरेसे आहेत असे वाटते

केवळ मत-मतांतरे मांडून आपण उत्तम पत्रकारीता करत आहोत असे बरखा व तिच्या जमातीस वाटत असेल तर ते चूक अहे. त्याच प्रमाणे त्यांच्या स्टूडिय़ो मधे मांडलेली मते हाच अभ्यासू व नवीन भारताचा चेहरा आहे असे त्यंनी व प्रेक्षकांनी समजणे हेही चूक व धोकादायक आहे.

काल पर्यंत टाइम्स ऑफ़ इंडिया व एनडीटीवी वरच्या निवडक बातम्या व ब्लॉग वर आलेल्या ’कॉमेंट्स’ चा वरवर जरी आढावा घेतला तर खालील चित्र दिसते.

http://www.ndtv.com/article/india/ayodhya-verdict-cong-seeks-reconciliation-bjp-says-let-temple-be-built-56172

Ayodhya verdict: Cong seeks reconciliation, BJP says let temple be built - Barakha’s live telecast

Slamming 17,Accepting 4,Other 4

http://timesofindia.indiatimes.com/india/ASI-report-far-from-foolproof/articleshow/6661930.cms

total 5, against 5

http://timesofindia.indiatimes.com/india/Not-the-job-of-HC-bench-to-adjudicate-where-Ram-was-born-/articleshow/6661925.cms

Opposing the views 16,Accepting 4

http://blogs.timesofindia.indiatimes.com/Introspection/entry/bapu-hinduism-and-saffron-terror#comments-

30+ opposing comments,very few admiring comments

याचा अर्थ इंटरनेट ची उपलब्धी असणार्‍या लोकांमधले बहुसंख्य हे ह्या दूषित व ठरवून मुस्लिम धार्जिण्या बातम्यांना नाकारत आहेत हे स्पष्ट दिसते आहे. पण तरीही ही माध्यमे ह्याची दखल घेत नाहीत, व पक्षपाती पत्रकारीता चालूच ठेवतात.

आणि बरखा बोलतच राहते.

* ह्या लेखाचा रोख हा माध्यमांची पक्षपाती पत्रकारीता असून निकालाचे विश्लेषण नाही हे ध्यानात घ्यावे

* लेखातील शुध्द्लेखनातील त्रूटी व इंग्रजी प्रतीशब्द कळवल्यास आभारी असेन

Comments