पाउसरात
झिम्म भिजली पाउसरात ही
गर्द कोवळी चिंब पालवी
काजळकाळी कातळ झाली
क्षणभर स्पर्शित तान सुगंधी
बहरली तीच जुईची फांदी
धुक्याची धवलपरी, रुपेरी चंद्रझुला
थेंबांचे लोलक मोठे, त्यात चांदणी हसरी
करडा भुरका कपूस ओला, त्यातच उसळे वारा
पाण्यात उभे क्षितीज धुंदले, रिमझिमतो गारवा
ही रात्र कॄष्णरेशमी
लय उतरत्या पावसाची
गर्द कोवळी चिंब पालवी
काजळकाळी कातळ झाली
क्षणभर स्पर्शित तान सुगंधी
बहरली तीच जुईची फांदी
धुक्याची धवलपरी, रुपेरी चंद्रझुला
थेंबांचे लोलक मोठे, त्यात चांदणी हसरी
करडा भुरका कपूस ओला, त्यातच उसळे वारा
पाण्यात उभे क्षितीज धुंदले, रिमझिमतो गारवा
ही रात्र कॄष्णरेशमी
लय उतरत्या पावसाची
Comments