चांदणबन


एक रान अंधारलेले
उंच उंच गेले झाडांचे पिसारे, निळ्या आभाळाच्या शोधात
तर तिथेही मावळतीचे रंग मिसळलेले ...
हिरवीओली निःशब्द माती
आणि ओसरत्या उजेडाची उब पांघरलेल्या पानाफांद्यांची सळसळ
आता उन्हाची वाट परतीची
दूर पाणवठ्यावर स्तब्ध पाखरू
आणि सोनेरी गवतावर उधळलेले हरिणांचे ठिपके
सांजवेळी आवरु आवरु
अंधाराचे अबोल सावट
गुंतल्या फांद्या, अंधुक वाटा, वाहते पाणी रंग विसरले
पण संथ उमटली आकाशगंगा,
कृष्णनिळे आकाश उजळले
माळरानी चांदणबन फुलले

Comments

Popular Posts